दररोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी!

आता तुमच्या WhatsApp वर
चला तर मग, आजच MARATHI TALK ला जॉईन करा🤝
Join Now, Absolutely Free
.

Majhi Ladki Bahin Yojana Apply Online : लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस !

महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच ‘<मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. या योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. मात्र, यासाठी अर्ज करताना अनेक महिलांना रांगेत उभे राहून त्रास सहन करावा लागतो आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता थेट मोबाईवरून ऑनलाईन (Majhi Ladki Bahin Yojana Apply Online) अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने देखील तहसील कार्यालयात जाऊन किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने किंवा सेतू कार्यालयात हा अर्ज दाखल करता येतो.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ! Majhi Ladki Bahin Yojana Apply Online:

ज्या महिलांना मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठीही राज्य सरकारने नारीशक्ती दूत नावाच्या अ‍ॅपचा वापर करण्याचा पर्याय दिलेला आहे.  ‘नारीशक्ती दूत’ अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्हाला अर्ज भरता येऊ शकतो. त्यासाठी अ‍ॅपमध्ये जाऊन तुमची माहिती भरून आपलं प्रोफाईल तयार करावे.

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून किंवा गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot’ असे सर्च करून हे ॲप डाऊनलोड करा.

https://play.google.com/store/apps/Narishakti-Doot

‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot.

पुढे ‘Accept Term and Condition’ वर क्लिक करा आणि स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा. ज्या मोबाईल क्रमांकाने तुम्ही लॉगीन केलं, त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला OTP येईल. तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाकून ‘Verify OTP’ या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर ‘तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा’ असा संदेश येईल. तिथे ‘आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा’, या पर्यायावर क्लिक करा.

प्रोफाईल अपडेट करताना, तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी (पर्यायी), जिल्हा, तालुका, नारीशक्तीचा प्रकार अपडेट करा.

प्रोफाईल अपडेट केल्यानंतर खाली ‘नारीशक्ती दूत’ या पर्यायावर क्लिक करा. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या पर्यायावर क्लिक करा.

महिलेचे संपू्र्ण नाव (आधार कार्डप्रमाणे), पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्म तारीख, जन्माचे ठिकाण (गाव/ शहर) पिनकोड, पूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहे का?, वैवाहिक स्थिती आणि बॅंक खात्याचा तपशील भरा.

संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर सही करा आणि पुन्हा अपलोड करा) आणि बॅंकेच्या पासबूकच्या फोटो आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा, आणि खाली ‘जतन करा’ या पर्यायावर क्लिक करा.

तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही, तपासून घ्या आणि ‘अर्ज दाखल करा’, या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी भरून अर्ज दाखल करा.

अर्ज संपूर्ण भरून सबमिट केल्यानंतर केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.

ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज  भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी लागेल. तर शहरी भागातील महिलांना वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी.

या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास १ जुलैपासून सुरुवात झाली असून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण – CM Majhi Ladki Bahin Yojana योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (Mukhyamantri Sahayata Nidhi) वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठित करण्यात…

Read more

इंडियन ऑइल मध्ये 246 जागांसाठी भरती – 2025

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी (IOCL Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून,…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

AGRICULTURE SCHEME

राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

      सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

      आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

        आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

        PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

          PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

          सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

            सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

            रब्बी पीक विमा योजना : १ रुपयात करा पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज !