दररोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी!

आता तुमच्या WhatsApp वर
चला तर मग, आजच MARATHI TALK ला जॉईन करा🤝
Join Now, Absolutely Free
.

सातबारा अथवा फेरफार उताऱ्यावरील न्यायालयीन वाद, दावे-प्रतिदावे घरबसल्या एका क्लिकवर कळणार…!

💁🏻‍♂️ जमिनीसंदर्भात महसूल विभागात अथवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे की नाही, याची माहिती आता घरबसल्या मिळणार आहे. भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर तसेच ईक्‍युजेसीच्या https://eqjcourts.gov.in/startup/default.php या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

👩🏻‍💻 या संकेतस्थळावर नागरिकांनी जमिनीचा सर्व्हे नंबर टाकल्यास या जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे की नाही, याची माहिती होईल. या सुविधेमुळे जमिनींची खरेदी-विक्री करताना होणारी नागरिकांची फसवणूक टळणार आहे.

💰सध्या सर्वच भागात जमिनींना सोन्याचा भाव आलेला आहे. जमिनींना चांगला भाव मिळत असल्याने अनेक जमिनींबाबत वाद सुरू आहेत. जमिनी खरेदी करतेवेळी या जमिनींच्या दाव्यांची माहिती मिळत नाही. त्यामुळे दस्तनोंदणी झाल्यानंतर जमिनीमध्ये वादविवाद असल्याचे लक्षात येते. तोपर्यंत खरेदी व्यवहार पूर्ण झालेला असतो. पैसे सुद्धा दिलेले असतात. अशा प्रकरणांमध्ये खरेदीदाराची फसवणूक होते.

📃जमिनीची खरेदी-विक्री करताना सर्च रिपोर्ट घेतला जातो. परंतु अनेकदा त्यामध्ये जमिनीवरील न्यायालयीन वाद सुरू असल्याचे दिसून येत नाही. तसेच सातबारा उतारा अथवा फेरफार उताऱ्यावर न्यायालयीन वाद सुरू असल्याचे कुठेही नोंद नसते. त्यातून खरेदीदारांची फसवणूक होते. तसेच नव्याने न्यायालयीन वाद निर्माण होतात. गेल्या काही वर्षात अशा प्रकारे फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने महसूल व दिवाणी न्यायालयातील जमीनविषयक दावे सर्व्हेनंबर निहाय लिंक करण्याची योजना आखली आहे.

🧾 महाभूमी या संकेतस्थळावर तसेच https://eqjcourts.gov.in/startup/default.php या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संकेतस्थळावर विभाग, जिल्हा, तालुका, गाव निवडावे लागणार आहे. गाव निवडल्यानंतर सर्व्हे नंबर टाकल्यानंतर त्या जमिनीसंबधित कोणत्या न्यायालयात दावे सुरू आहेत की नाही, याची माहिती मिळते.

👨🏻‍⚖️ महसूल विभागात या अधिकाऱ्यांकडे सुरू असते सुनावणी
महसूल विभागातील मंडल अधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अपर विभागीय आयुक्त, महसूलमंत्री, महसूल न्याय प्राधिकरण यांच्याकडे सुरू असलेल्या जमिनींच्या दाव्यांची माहिती मिळणार आहे.

🙏🏻 कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा…

Related Posts

राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान National Mission On Natural Farming (Naisargik Sheti – NMNF) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाने जारी केल्या आहेत. निसर्गावर आधारित शाश्वत शेतीच्या प्रणालींना चालना…

Read more

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४- २५ योजनेत सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (Solar Favarni Pump) वितरीत करण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ…

Read more

AGRICULTURE SCHEME

राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

      सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

      आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

        आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

        PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

          PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

          सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

            सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

            रब्बी पीक विमा योजना : १ रुपयात करा पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज !