रत्नागिरी जिल्हयातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्यांबाबत मा. मंत्री (उद्योग) तथा पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०९.०२.२०२३ रोजी पार पडलेल्या तसेच मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०५.०९.२०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत माहे फेब्रुवारी व मार्च, २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमीनीचे व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दि. ०९.११.२०२३ रोजी रत्नागिरी जिल्हयातील ११,७८३ शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या व्याजापोटी रु. २७१.४६ लक्ष इतक्या रकमेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुसार माहे फेब्रुवारी व मार्च, २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमीनीचे व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे जिल्हाधिकारी / तहसिलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत अशा रत्नागिरी जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांच्या व्याजमाफीची कमाल रक्कम रू. २७१.४६ लक्ष (रुपये दोन कोटी एकाहत्तर लाख सेहेचाळीस हजार फक्त) अवेळी पाऊस व गारपीट आपग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी (कार्यक्रम) (२४२५ २४५३) या योजनेअंतर्गत अदा करण्यास सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णय दि. १२.०१.२०२४ नुसार मान्यता देण्यात आली आहे.
अवेळी पाऊस व गारपीट आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ होणार !
सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हयातील माहे फेब्रुवारी व मार्च, २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफी शासनामार्फत अदा करणेबाबत रू. २.११ लाख एवढा निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने संदर्भ क्र.४ मधील पत्रान्वये शासनास सादर केला आहे. तथापि, उपरोक्त लेखाशिर्षाखाली (२४२५ २५०६) सध्या निधी उपलब्ध नसल्याकारणाने, संदर्भ क्र. ५ मधील दि. ३१.०३.२०२४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, २०१७ (२४३५ ००८२) साठी उपलब्ध असलेल्या निधीतून रू. २.११ लाख इतका निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करण्यात आलेला रु. २.११ लाख इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, २०१७ लेखाशिर्ष (२४३५ ००८२), ३३- अर्थसहाय्य या अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करण्यात आलेला रु. २.११ लाख इतका निधी रत्नागिरी जिल्हयातील माहे फेब्रुवारी व मार्च, २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफी शासनामार्फत अदा करण्यासाठी अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी (२४२५ २४५३) ३३, अर्थसहाय्य या लेखाशिर्षांतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक (अंदाज व नियोजन) यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात येत आहे. सदर निधी आहरण करुन वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घ्यावी. तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास सादर करण्यात येईल.
सदर रक्कम मागणी क्रमांक व्ही-०२, २४२५-सहकार ८००-इतर खर्च, (००) इतर खर्च (००) (०२) अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी (२४२५ २४५३) ३३, अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीमधून खर्च करण्यात यावी. ४. सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक २१९/का.१४३१, दिनांक २२.०३.२०२४ अन्वये व वित्त विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक ३०७/२०२४/व्यय-२, दिनांक २७.०३.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय: अवेळी पाऊस व गारपीट आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.