![](https://marathitalk.in/wp-content/uploads/2024/12/4-scaled.jpg)
केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन या त्यांच्या बांधिलकीला अनुसरून हरयाणात पानिपत येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा सखी योजना (LIC Vima Sakhi Yojana) या योजनेचा शुभारंभ केला. भारताची महिला शक्ती ही महिला बचत गट, विमा सखी, बँक सखी, कृषी सखी या रूपात उर्जेचा आणखी एक महत्त्वाचा स्त्रोत आहे ज्यामुळे विकसित भारताच्या संकल्पाला बळ मिळेल. महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुरेशा संधी सुनिश्चित करणे आणि त्यांच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करणे अत्यावश्यक आहे.
भारतातील महिलांचा यापूर्वी विमा काढला जात नव्हता, आज लाखो महिलांना विमा एजंट किंवा विमा सखी बनविण्याची मोहीम सुरू झाली आहे. आता महिला विम्यासारख्या क्षेत्राच्या विस्ताराचे नेतृत्व करतील. विमा (LIC Vima Sakhi Yojana) सखी योजनेअंतर्गत 2 लाख महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारचे आहे. इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना विमा सखी योजनेंतर्गत प्रशिक्षण देऊन तीन वर्षांसाठी आर्थिक मदत केली जाईल.
एलआयसी विमा सखी योजना – LIC Vima Sakhi Yojana:
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा ‘विमा सखी योजना (LIC Vima Sakhi Yojana)’ उपक्रम 18-70 वर्षे वयोगटातील, दहावी उत्तीर्ण असलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी आरेखित करण्यात आला आहे. आर्थिक साक्षरता आणि विमा जागरुकता वाढवण्यासाठी या विमा सखींना पहिल्या तीन वर्षात विशेष प्रशिक्षण आणि विद्यावेतन मिळेल. प्रशिक्षणानंतर, त्या एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील तसेच पदवीधर विमा सखींना भारतीय आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी पदासाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल.
ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा विमा उतरवला जातो त्यावेळी मिळणारे फायदे खूप मोठे असतात, सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमाआणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबवत आहे. या योजनांतर्गत अत्यंत कमी विमा हप्त्यावर 2 लाख रुपयांचा विमा प्रदान करण्यात आला आहे.
देशातील २० कोटींहून अधिक लोक, जे विम्याविषयी विचारही करीत नाहीत, त्यांचा विमा उतरवण्यात आला आहे. या दोन योजनांतर्गत आतापर्यंत सुमारे 20 हजार कोटी रुपयांच्या दाव्याची रक्कम देण्यात आली आहे. देशातील अनेक कुटुंबांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यासाठी विमा सखी कार्यरत आहेत.
योजनेसाठी पात्रता:
- विमा सखी (LIC Vima Sakhi Yojana) योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करु शकतात.
- या महिलांकडं दहावी पास असल्याचं प्रमाणपत्रत असं आवश्यक आहे.
- या योजनेसाठी १८ ते ७० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात.
- तीन वर्षांनंतरच्या प्रशिक्षणानंतर या महिला विमा एजंटच्या स्वरुपात काम करु शकतील.
योजनेचे नियम:
- विमा सखी (LIC Vima Sakhi Yojana) योजनेंतर्गत तीन वर्षांच्या ट्रेनिंगनंतर संबंधित महिला एलआयसी एजंट म्हणून नियुक्त होईल. पण एलआयसीच्या ती नियमित कर्मचारी नसेल.
- नियमित कर्मचाऱ्यांचे कुठलेही लाभ या एजंटला मिळणार नाहीत.
- ज्या महिलांची विमा सखी म्हणून निवड होईल, त्यांना प्रत्येक वर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल.
योजनेअंतर्गत मानधन:
विमा सखी (LIC Vima Sakhi Yojana) योजनेशी संबंधित महिलांना तीन वर्षांच्या ट्रेनिंग दरम्यान २ लाखांहून अधिक मानधन मिळेल. यांपैकी पहिल्या वर्षी ७ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ६ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५ हजार रुपये महिन्याला मानधन मिळणार आहे.
ऑनलाईन अर्ज (Apply Online LIC Vima Sakhi Yojana): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.