दररोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी!

आता तुमच्या WhatsApp वर
चला तर मग, आजच MARATHI TALK ला जॉईन करा🤝
Join Now, Absolutely Free
.

Maha Dbt Farmers Schemes : या योजनेत शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

Maha Dbt farmer नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांसाठी अर्ज आता एकाच वेबसाईटवरून करता येत आहे. शासनाने आणलेल्या डिजिटल इंडिया अंतर्गत आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागत नाहीत. योजनेची अंमलबजावणी संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक पोर्टल बनवले आहे. या पोर्टल चे नाव महाडीबीटी असे आहे. या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी सर्व शासकीय योजना एकाच ठिकाणी आहेत.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आले आहे, ही योजना शासनाचे कृषी विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के, आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के असे तीन वर्षात एकूण शंभर टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

अनुदान

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाचा उभारणी करता शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत खालील पिकांसाठी अनुदान मिळणार आहे.

 

पात्रता

लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसवणे अनिवार्य आहे.

सर्व संवर्गा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

सातबारा व आठ अ उतारा

हमीपत्र

संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांची समिती पत्र

जातीचे प्रमाणपत्र ( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)

 

अर्ज कसा करावा

शेतकरी मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. यासाठी शेतकऱ्यांनी नेट कॅफे किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करावा. किंवा शेतकऱ्यांकडे कॅम्पुटर असल्यास स्वतःही अर्ज करू शकतात. परंतु मोबाईलवर अर्ज करता येत नाही. मोबाईलवर शासकीय वेबसाईट व्यवस्थित रित्या चालवणे थोडे अवघड आहे.

 

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट

 

Related Posts

राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान National Mission On Natural Farming (Naisargik Sheti – NMNF) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाने जारी केल्या आहेत. निसर्गावर आधारित शाश्वत शेतीच्या प्रणालींना चालना…

Read more

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४- २५ योजनेत सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (Solar Favarni Pump) वितरीत करण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ…

Read more

AGRICULTURE SCHEME

राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

      सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

      आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

        आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

        PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

          PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

          सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

            सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

            रब्बी पीक विमा योजना : १ रुपयात करा पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज !