दररोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी!

आता तुमच्या WhatsApp वर
चला तर मग, आजच MARATHI TALK ला जॉईन करा🤝
Join Now, Absolutely Free
.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : 50 हजार प्रोत्साहनपर लाभासाठी कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करा !

सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे.

ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही, त्यांना आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) झाल्यानंतर प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल, २०२४ रोजीच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले.  या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही.

अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – MJPSKY:

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली.

सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये 50 हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी महा-आयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बॅंकांनी एकूण 29 लाख 2 हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली. त्यापैकी, 4 लाख 90 हजार कर्जखाती आयकर दाते, पगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरली, तर साधारणत: 8 लाख 49 हजार कर्जखाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली आहेत.

पात्र ठरलेल्या 15 लाख 44 हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) करण्यात आले.

प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी 14 लाख 40 हजार कर्जखात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण – MJPSKY KYC :

शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) करुन घ्यावे.

संदर्भ : महासंवाद

Related Posts

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (Mukhyamantri Sahayata Nidhi) वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठित करण्यात…

Read more

इंडियन ऑइल मध्ये 246 जागांसाठी भरती – 2025

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी (IOCL Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून,…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

AGRICULTURE SCHEME

राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

      सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

      आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

        आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

        PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

          PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

          सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

            सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

            रब्बी पीक विमा योजना : १ रुपयात करा पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज !