दररोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी!

आता तुमच्या WhatsApp वर
चला तर मग, आजच MARATHI TALK ला जॉईन करा🤝
Join Now, Absolutely Free
.

रब्बी पीक विमा योजना : १ रुपयात करा पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज !

रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत रब्बी पीक (Rabbi Pik Vima) विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. रब्बी हंगामात पिकांना विमा सरंक्षण मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे गरजेचे आहे.

रब्बी पीक विमा योजना – Rabbi Pik Vima:

रब्बी हंगामातही प्रति अर्ज एक रुपयांत पीक (Rabbi Pik Vima) विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.

कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. पीक (Rabbi Pik Vima) विमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे.

रब्बी हंगामात विविध पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून गावस्तरावर जनजागृती केली जात आहे.

सामूहिक CSC सेवा केंद्रावर भरता येईल ऑनलाईन अर्ज:

पीक (Rabbi Pik Vima) विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज संकेतस्थळावर स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत अर्ज करता येतो.

मुदतीपूर्वी विमा भरावा.

पिकांना विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो. त्यासाठी रब्बी हंगामात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Rabbi Pik Vima) : 1 रुपयात पीक (Rabbi Pik Vima) विम्याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

पीक विमा अ‍ॅप (Rabbi Pik Vima App): पीक विमा अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

विमा कंपनी संपर्क: विमा कंपनी संपर्क यादीसाठी इथे क्लिक करा.

सामायिक सुविधा केंद्राच्या (CSC) माध्यमातून विमा अर्ज (Crop Insurance Application) भरताना शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे शुल्क देणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकऱ्याने स्वतःचा सातबारा आठ अद्ययावत उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे.

याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्काची मागणी सामायिक सुविधा केंद्र चालकाने केल्यास याबाबत तक्रार खालील टोल फ्री क्रमांक वर करण्यात यावी, याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे कळविण्यात आले आहे.

सीएससी गव्हर्नर सर्विसेस इंडिया लिमिटेड

टोल फ्री क्रमांक :- १४५९९/१४४४७

व्हाट्सअप क्रमांक :- ९०८२६९८१४२

तक्रार नोंद क्रमांक :- ०११- ४९७५४९२३ /४९७५४९२४

खालील लेख देखील वाचा!

  • PMFBY Crop insurance : फळपिक विमा योजना सुरु २०२४!
  • Related Posts

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे!

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (Mukhyamantri Sahayata Nidhi) वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठित करण्यात…

    Read more

    राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान National Mission On Natural Farming (Naisargik Sheti – NMNF) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाने जारी केल्या आहेत. निसर्गावर आधारित शाश्वत शेतीच्या प्रणालींना चालना…

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    AGRICULTURE SCHEME

    राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

      राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

      सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

        सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

        आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

          आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

          PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

            PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

            सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

              सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

              रब्बी पीक विमा योजना : १ रुपयात करा पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज !