केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) वर्ष २०२५ साठीच्या विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीने सीएसई, एनडीए, एनए, सीडीएस, ईएसई, आयएफसी, आयईएस, आयएसएस, जिओ सायंटिस्ट आणि इतर परीक्षांसाठी नोंदणी आणि परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.
यूपीएससी २०२५ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
यूपीएससीच्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा (ईएसई प्रिलिम्स) २०२५ साठी नोंदणी १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत होईल. यानंतर ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ही परीक्षा होणार आहे. तसेच संयुक्त भू- शास्रज्ञ (प्राथमिक) परीक्षादेखील ९ फेब्रुवारी २०२५ लाच होणार आहे. नागरी सेवा परीक्षा २०२५ आणि भारतीय वनसेवा परीक्षा २०२५ म्हणजेच युपीएससी पूर्व परीक्षेसाठी (सीएसई) नोंदणी प्रक्रिया २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा २५ मे रोजी पार पडेल. ही प्रिलिम्समध्ये यशस्वी होत असलेल्या उमेदवारांसाठी नागरी सेवा मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट २०२५ पासून आयोजित केली जाईल, ही परीक्षा ५ दिवस चालणार आहे. परीक्षांच्या तारखांसाठी उमेदवारांनी युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर पहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यूपीएससी वेळापत्रक २०२५:
यूपीएससी चे अधिकृत संकेतस्थळ : UPSC चे अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.