![](https://marathitalk.in/wp-content/uploads/2024/12/2-scaled.jpg)
शेतकऱ्यांना RBI ने दिलासा देत कृषी कर्जाची मर्यादा विनाहमीसह (Vinahami Peek Karj) दोन लाख रुपये केली आहे. पीक कर्जाची नवी मर्यादा १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) शेतकऱ्यांना नव्या वर्षाची भेट दिली आहे. शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं शेतकऱ्यांना विनाहमी देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विनाहमी पीक कर्ज! Vinahami Peek Karj:
आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विनाहमी (Vinahami Peek Karj) पीक कर्जाची मर्यादा १.६ लाख रुपये होती. ही नवी मर्यादा १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल, असं कृषी मंत्रालयानं शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आरबीआयनं २०१० मध्ये कृषी क्षेत्राला विनाहमी कर्ज (Vinahami Peek Karj) देण्यास सुरुवात केली होती. रिझर्व्ह बँकेनं एक लाख रुपये विनागॅरंटी देण्याची घोषणा केली. २०१९ मध्ये ही मर्यादा वाढवून १.६ लाख रुपये करण्यात आली होती. आता त्यात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
लघु व मध्यम शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं त्यांच्या शेतीवर परिणाम होत होता. त्यामुळे या शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेनं वाढवलेली मर्यादा फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांकडं साधनसामुग्री अत्यंत मर्यादित होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या विनाहमी (Vinahami Peek Karj) कर्जाचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळं विशेषत: लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (८६ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रफळ) अधिक कर्ज उपलब्ध होईल, अशी अपेक्षा कृषी मंत्रालयानं व्यक्त केली आहे.
आरबीआय अधिकृत सूचना (RBI Vinahami Peek Karj Notification):
शेतीसाठी कर्ज प्रवाह – संपार्श्विक मुक्त कृषी कर्ज बाबत RBI ची अधिकृत सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.